काँग्रेसचे जनजागरण अभियान केंद्राच्या महागाई विरोधातील लोकचळवळ. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕दरुर येथे काँग्रेसचे दोन दिवसीय जनजागरण अभियान.

गोंडपिपरी :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने जन जागरण अभियान राबविण्यात येत आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी तालुक्यातील दरुर येथे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती, भारताच्या पहिल्या महीला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन दिवसीय जन जागरण अभियान राबविण्यात आले. पहिल्या दिवशी स्वागता करीता गावातील कुटुंबांनी रांगोळी काढून आणि फुलाचा वर्षाव करीत आमदार सुभाष धोटे आणि जनजागरण करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले. महागाई विरोधात जन जागरण फलक, घोषणा फलक लोकांचे लक्ष वेधून घेतले. सायंकाळी गावकऱ्यांसमवेत भजन मंडळी सोबत प्रभात फेरी व सभा घेण्यात आली, गावकर्‍यांच्या जेवणाचा कार्यक्रम आटोपून लोककलेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक गोंधळ घेऊन जनजागरण करण्यात आले तर दिनांक २० नोव्हेंबर ला सकाळी गावातील भजनी मंडळी, शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला यांच्या समवेत गावात प्रभात फेरी काढून जनजागरण करण्यात आले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, तिन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर वर्षभरापासून आंदोलन करीत आहेत. यात ७०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झालेत. या शेतकऱ्यांना खलिस्तानी, नक्षली, आंदोलनजीवी असे अनेक दोष लावून आंदोलन कमजोर करण्याचे काम केले गेले मात्र शेतकऱ्यांच्या एकतेपुढे मग्रूर सरकारला अखेर झुकावे लागले आणि आता निवडणूकीच्या तोंडावर हे काळे कायदे मागे घेणार असल्याचे स्वतः पंतप्रधानांनी म्हटले आहे. मात्र धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. शहिद शेतकऱ्यांना योग्य मोबदला, एम. एस. पी. यासोबतच पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचे गॅस, खाद्यतेल यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या जीवघेणी दरवाढ मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी आता गावागावातील जनतेने पेटून उठले पाहिजे. गोरगरीब जनतेवर अन्याय करणाऱ्या या मग्रूर सरकारला धडा शिकविण्याची सर्वसामान्य नागरिकांचे नैतिक कर्तव्य आहे. तेव्हा इथून पुढे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला, गोरगरीब जनता यांनी अधिक दक्ष राहून यांच्या प्रत्येक उमेदवारांना निवडणूकीत पराभूत करून सामान्य माणसाची ताकद यांना दाखवून दिली पाहिजे.
या प्रसंगी सुरेश चौधरी सभापती कृ. उ.बा.स, अरुण धोटे नगराध्यक्ष न. प. राजुरा, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, संभुजी येल्लेकर संचालक कृ.उ बा.स., विनोद नागापुरे अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, निलेश संगमवार कार्याध्यक्ष, अशोक रेचनकर संचालक कृ. उ.बा.स., गौतम झाडे तालुकाध्यक्ष अनुसूचीत जाती/जमाती विभाग, रेखा रामटेके तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी, संतोष बंडावार देवेंद्र बट्टे शहराध्यक्ष, सरपंच उषाताई धुळसे, उपसरपंच बालाजी चानकापूरे, तूकेश वानोडे, आशिर्वाद पिपरे, दुर्गेताई, रामू कुरवतकर, राजू चंदेल, राकेश पून, देविदास सातपुते, श्रीनू कंदनूरवार, नामदेव सांगडे, सुनील फुकट, दरुर येथील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच बालाजी चनकापूरे, यांनी केले. सुत्रसंचालन सचिन फूलझले यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक रेचानकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *