लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- २०/११/२०२१ :-* महाराष्ट्र कामगार सेना प्रणित शेतमजुर व असंघटीत कामगारांचा मेळावा दि. २१/११/२०२१ रविवार रोजी सकाळी १० वाजता कामगार सेना कार्यालय (पद्मशाली चौक) येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतमजुर व असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना जाहिर केले आहेत. त्याच बरोबर कामगार सेनेच्या वतीने कोरोना महामारीत लॉकडाऊन कालावधीत शेतमजुर व असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगारांना प्रत्येकी १५ हजार रुपये अनुदान ( मदत ) मिळावे म्हणून मागणी अर्ज शासनाकडे दाखल करण्यात आले. त्यासंदर्भी व शेतमजुरांना पेन्शन, अनुदान व कामगार म्हणून मान्यता मिळावे यासाठी कामगार राज्यमंत्री मा.ना. श्री. बच्चु कडू साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले. त्यावरून येत्या काही दिवसात मा.ना.श्री. बच्चु कडू साहेब हे मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावणार आहेत. सदर बैठकीची माहिती व सोलापूर व असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगारांना आर्थिक मदत या संदर्भी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) हे माहिती देणार आहेत.
तरी सदर मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतमजुर व असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगारांनी उपस्थित राहवे असे आहवान कामगार सेनेचे अध्यक्ष :- दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, रेखा आडकी यांनी केले आहे.