लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– कार्तिक पौर्णिमा च्या शुभ मुहूर्तावर राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे सामुदायिक तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले. कार्तिक पौर्णिमा हा मुहूर्त सात्विक मानला जातो. तुळशी ही मांगल्याचे प्रतीक आहे. रूढी परंपरेनुसार प्रत्येक घरामध्ये तुळशीचे वृंदावन असते. तुळशीची पूजाअर्चा करून शुभ कार्याला सुरुवात केली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वारकरी संप्रदायाचे लोक पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पाई वारीने जात असतात. वारीमध्ये डोक्यावर वृंदावन घेतलेल्या वारकर्यांल्याला कुठलीही इजा व त्रास जाणवत नाही. त्यामुळेच कळमना येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या उपस्थितीत सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने सामुदायिक तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला. गावातील लोकांना उत्तम आरोग्य लाभावे या उदात्त भावनेने कळमनाचे सरपंच तथा काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे महाराष्ट्र सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी गावात सामुदायिक तुळशी विवाहाचे आयोजन केले.
या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजने, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, भाऊजी पाटील वाढई, उपसरपंच कौशल्या मनोहर कावडे, ग्रा प सदस्य रंजना दिवाकर पिंगे, सुनिता ऋषी उमाटे, महादेव पाटील पिंगे, कवळू पाटिल पिंगे, लटारी पाटील बल्की, देवाजी पाटील चापले, अशोक पाटील कावळे, विठ्ठल पाटील वाढई, मदन पाटील वाढई, सुरेश मुठलकर, पुंडलिक पाटील पिंगे, उद्धव पाटील आस्वले, श्याम सुंदर अटकारे, शंकर ताजणे, शामराव चापले, महादेवराव आंबीलकर, मनोहर कावडे, आशिष ताजणे, विनोद चौधरी, भूषण ताजणे, नितेश पिंगे, संतोष चौधरी, दत्तु पिंपळशेंडे, विठ्ठल विदे, संगीता ताजने, सुमन आस्वले, शकुनबाई पिंगे, इंदिरा मेश्राम, संगिता अटकारे, शकुनबाई सपाट, रेखाबाई पिंपळशेंडे यासह गावकरी उपस्थित होते.