By : Mohan Bharti
“आता लाजू नका”
चिमूर क्रांती भूमीत पत्नी पीडित पुरु। षांच्या अत्याचार विरोधी लढा..
भारतीय परिवार बचाव संघटना चिमूर ता चिमूर जि चंद्रपूर यांच्यातर्फे चिमूर येथे एकदिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला। संत भय्युजी विद्यालय चिमूर येथे रविवार ७ नोव्हेंबर ला झालेल्या कार्यक्रम ला ऍडवोकेट नाईक सर नागपूर, मर्द या पुरुष अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अधिभारी नरेंद्र पोलादे सर, डॉ नंदकिशोर मैंदळकर चंद्रपूर, योगशिक्षक संतोष वेखंडे, गजेंद्र चाचरकर नागपूर, मुख्याध्यापक विनोद पिसे चिमूर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते।
काही दुष्ट विवाहित महिला त्यांच्या संरक्षण साठी असलेल्या हुंडा विरोधी कायद्यांचा, भा द वि कलम ४९८ ए, कौटुंबिक हिंसाचार, डी व्ही ऍक्ट, पोटगी १२५ चा दुरुपयोग करतात आणि पुरुष आणि त्यांच्या नातेवाईक ला त्रास देतात, त्यांचे वर अत्याचार करतात। अशा पत्नी पिडीत पुरुषांना आणि नातेवाईक ना मार्गदर्शन व्हावे, हिंमत यावी यासाठी श्री व्ही आर भलमे चिमूर, श्री सतीश पोइनकर नेरी, श्री दिलीप खोब्रागडे भिसी, डॉ गेडाम (देव) चिमूर आणि संपूर्ण चिमूर च्या टीम हे चर्चासत्र कार्यक्रम आयोजित केले होते।
पत्नीपीडित अवस्था म्हणजे एक बिमारी आहे। आपण सर्व रोगग्रस्त आहोत। हा रोग नशिबाने होतो। जेव्हा विवाह होतात तेव्हा आपण लग्नाआधी कायदे वाचले असतात का ? लग्न हे सामाजिक व्यवस्था नुसार रितीरिवाज नुसार होते। मग सामाजिक व्यवस्था रितीरिवाज नुसार च पुढले प्रश्न सुटायला पाहिजे। महिलांसाठी वेगळे कायदे करण्याची काय आवश्यकता ? असा प्रश्न श्री पुरुष अधिकार संघटनेचे राज्य प्रभारी पोलादे यांनी केला। पुरुषांच्या अधिकारासाठी वेगळे मंत्रालय असावे अशी मागणी केली।
एकदा का वैवाहिक संबंध ताटातूट चे अवस्थेत गेला की खूप वाईट परिस्थिती उद्भवते। कितीतरी दिवस झोप लागत नाही, निमूटपणे सर्व सहन करावे लागते। पोलीस, कोर्ट कचेऱ्या, हिंसाचार मधून काही निष्पन्न होत नाही। अशे वाटते की बायकोला जे करायचे करू द्यावे। बायकोच्या वागणुकी कडे दुर्लक्ष करावे। हाच एक पर्याय उरतो। सर्व टेन्शन सहन करण्या साठी योग या पर्याय आहे। अशे प्रतिपादन श्री संतोष वेखंडे यांनी केले।
महिला ना वैवाहिक संरक्षण साठी असलेले कायदे आणि कायद्यातील त्रुटी, न्यायप्रविष्ट प्रकरणे आणि कायदेशीर लढाई याबाबत नागपूर हायकोर्ट चे वकील श्री नाईक यांनी मार्गदर्शन केले।
डॉ नंदकिशोर मैंदळकर चंद्रपूर यांनी सुद्धा कृतिशील भूमिका मांडली। पत्नीपीडित पुरुषांनी एक दुसऱ्या ला मदत केली पाहिजे अशे त्यांनी आवाहन केले।
कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी गजेंद्र दि चाचरकर यांनी मूळ कारनाना हात घालत बदलत्या परिस्थिती ला, पाश्चात्य मानसिकता आणि मीडिया ला दोष दिला। निसर्गाने स्वतः पुरुष आणि महिला ला असमान बनविले। आम्ही देवाला पुरुष महिला असमान बनवायला सांगितले होते का ? निसर्ग नियम काय सांगतो ? पुरूषाला महिलांपेक्षा शारीरिक दृष्टीने का म्हणून बलवान बनवावे ? कारण काही दुष्ट महिलांना आवर घालण्या साठी पुरुषांना हात उगारावा लागेल हे निसर्गाला माहीत होते। पुरुषांना देवाने दिलेली ही शारीरिक ताकद, अभिमान ही निसर्गाची देणं आहे। पुरुषाला कुटुंब प्रमुखाची जबाबदारी दिली आहे। महिलांना त्यांचे परीने पुर्वनियोजित पणे पुरुषांच्या पेक्षा ही सक्षम बनविले आहे। महिलांसाठी वेगळे कायदे बनविण्याची गरज काय ? चुकीने चुकीचे कायदे बनविल्या गेले आहेत। आपण ही कायदे बदलण्याची तयारी करावी अशे प्रतिपादन केले। भारतीय महिलांना स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली। महिलांनी शिक्षण घ्यावे याचा अर्थ आपली जबाबदारी सोडून कशीही मनमानी करावी, नवऱ्याच्या नातेवाईकांना त्याचे पासून तोडावे, मानसीक त्रास द्यावा असा स्त्री शिक्षणाचा अर्थ होतो का ? असाही प्रश्न त्यांनी केला।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद पिसे मुख्याध्यापक यांनी केले। चिमूर भागात पत्नीपीडित च्या भरपूर केसेस आहेत। पीडितांना आधार मिळावा, मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला। जवळपास नऊ वर्षांपूर्वी चिमूर असा कार्यक्रम घेण्यात आला याची त्यांनी आठवण करून दिली। कार्यक्रम च्या यशस्वी ते करिता
श्री व्ही आर भलमे चिमूर, श्री सतीश पोइनकर नेरी, श्री दिलीप खोब्रागडे भिसी, डॉ गेडाम (देव) चिमूर,श्री प्रशांत मडावी जांभुळघाट,श्री मोहन जिवतोडे(म्हाडा कॉलोनी) दाताळा चंद्रपूर आणि संपूर्ण चिमूर तालुक्यातील तसेच चंद्रपूर च्या टीम ने मेहनत घेतली। प्रचारा करीत पुरुषांनो “आता लाजू नका” या हेडिंग सहित पॉम्प्लेट छापून चिमूर परिसरात वाटण्यात आले।आम्हांला सुद्धा आया बहिणी आहेत पण दोषी बायांना वठणीवर आणण्यासाठी आम्ही निष्प्रभ ठरतो। कायदे आणि व्यवस्था महिलांचे बाजूने असल्याने पुरुष कौटुंबिक मानसिक त्रास निमूटपणे पणे सहन करतात सर्व पत्नीपिढीत पुरुषांनी एकत्र येण्याची गरज आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वसंत भलमे चिमुर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रशांत मडावी जांभुळघाट यांनी केले।