By : Mohan Bharti
गडचांदूर : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्याबद्दल कोरपना कोर्ट व गडचांदूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले, सदर कार्यक्रमास ऍड,अर्पित धोटे व शंतनू देशमुख यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले , कार्यक्रमांमध्ये पोलीस स्टेशन गडचांदूर हद्दीतील पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष हजर होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस स्टेशन गडचांदूर चे ठाणेदार श्री सत्यजित आमले यांनी केले.