लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती :– राजुरा विधानसभा क्षेत्रात आदिवासी बांधवांची संख्या मोठी असून येथे आदिवासी बांधव अनंत वर्षांपासून दिवाळी सनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पारंपरिक आदिवासी संस्कृतीला अनुसरून मोठय़ा आनंदाने, उत्साहाने आणि प्रामाणिकपणाने दिवाळी उत्सव साजरा करीत असतात. ही बाब लक्षात घेऊन लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहुन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घेतले. आमदार सुभाष धोटे यांचे या क्षेत्रातील आदिवासी बांधवांसोबत पिढ्यानपिढ्या पासूनचे स्नेहसंबंध आहे. ते नेहमीच आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करीत असतात मात्र या वेळी चक्क खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनाही आदिवासी बांधवांच्या दिवाळी उत्सवाने भुरळ घातली आणि त्यांनी येथे दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांसोबत उपस्थित राहून त्यांच्या सांस्कृतिक परंपरा आणि मुल्य व्यवस्थेचे दर्शन घेतले.
या प्रसंगी माजी जि. प. सदस्य भिमराव पाटिल मडावी यांच्या घरी कार्यकर्ता बैठक ही घेण्यात आली. यात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून क्षेत्रातील योजनाांचा / काययक्रमाांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या प्रकल्पस्तरीय समितीवर नियुक्ती झालेले अध्यक्ष भिमराव पाटील रामचंद्र मडावी, अशासकीय सदस्य सौ ललिता गेडाम, विष्णू मोतीराम सिडाम, लोमेश नत्थूजी उईके, विलास रामदास मडावी, आनंदराव विठुजी कोडापे, प्रदीप उत्तमराव गेडाम यांचे खासदार आणि आमदारांनी अभिनंदन केले.
या प्रसंगी पंचायत समिती सभापती अंजनताई पवार, उपसरपंच सिताराम मडावी, भिमराव पवार, पाटण येथील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.