कृषीपंपधारक शेतकऱ्यांवर महावितरणची मनमानी.

लोकदर्शन👉 मोहन भारती


⭕दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नंदकिशोर वाढई यांची पालकमंत्र्यांकडे मागणी.

राजुरा :– राजुरा तालुक्यात सध्या शेतक-यांच्या रब्बी हंगाम चालु आहे. शेतक-यांना कृषिपंपाच्या सहाय्याने शेतीला पाणीपुरवठा करावा लागतो. परंतु महावितरण कंपनी एका ट्रान्सफारवर जर ६ कृषि पंपाची लाईन असेल तर त्यापैकी ८० टक्के लोकांनी विज बिल भरले असल्या शिवाय ते ट्रान्सफम सुरू करण्यात येत नाही. हा परिसरातील शेतकऱ्यांवर खुप मोठा अन्याय सुरू आहे. त्यात नियमित बिल भरणारे शेतकरी सुध्दा भरडले जात आहेत. ६ पैकी ३ शेतक-यांनी विज बिल भरले असल्यास त्या शेतक-याचा विज पुरवठा सुद्धा खंडीत केल्या जात आहे. महावितरण कंपनीच्या या अरेरावी, मनमानी कारभारामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. करीता सदर गंभीर बाब लक्षात घेऊन परिसरातील कृषी पंप धारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा तसेच मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कळमनाचे सरपंच, काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी महाराष्ट्राचे बहुजन कल्याण, खार जमीनी विकास, मदत व पुर्नवसन मंत्री तथा पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, आदिवासी नेते तथा भुरकुंडा बु. चे सरपंच नामदेव कुमरे, महादेवराव ताजणे माजी उपसरपंच कळमना, लहुजी चाहारे माजी सरपंच माथरा, कवडु पाटील सातपुते माजी सरपंच खामोना, राकेश हिंगाने सरपंच कडोली बु, जाधव उपसरपंच भुरखुडा बु, विठ्ठल राव वाढई, केशव आडे बंडु पाटील पहानपटे आदींची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *