By : Mohan Bharti
गडचांदूर : सध्या स्थितीमध्ये शेतकर-यांचा कापूस व सोयाबीन काढण्याची वेळ सुरु आहेत. त्यामुळे त्यांना उशिरा संध्याकाळपर्यंत शेतात थांबावे लागते. भरपूर शेतकऱ्यांना रात्री च्या वेळी बैलगाडीने शेतातून घरी परतताना वाहतूक रस्ता ओलांडावा लागतो. त्यावेळेस अपघात होण्याचा संभाव्य धोका असतो तो टाळण्यासाठी व आपल्या शेतकऱ्यांचा हिताचा विचार करत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे आपल्या नजीकच्या आवारपूर, बीबी, नांदा, पालगाव, नोकारी, राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयगाव, हिरापूर व सांगोळा अशा बारा गावातील ४१२ बैल बंड्यांना रीफ्लेकटर रेडियम लावण्यात आले.
हा कार्यक्रम अल्ट्राटेकचे युनिट हेड मा. श्रीराम पी.एस. यांच्याकडून प्रेरणा घेत अल्ट्राटेक चे व्यवस्थापक संजय शर्मा व कर्नल दीपक डे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील एक महिन्यापासून राबवण्यात आला. त्याबद्दल गावांतील सर्व शेतकऱ्याने अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनचे आभार मानले व उत्तम कार्य केल्याबद्दल स्तुती सुद्धा केली.
यशस्वीतेकरिता सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी अथक परिश्रम घेतले.