लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्रात रस्ते, पुल, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य, पर्यटन, सिंचन सुविधा अशा विविध स्वरूपाची विकास कामे सुरू असून शासनाकडून करोडो रुपयाचा निधी उपलब्ध केला आहे. क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी विकास कामात सातत्य ठेवणार असून आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राजुरा विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकासक हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी गांधी भवन राजुरा येथे दिवाळी निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, आपल्या मागील कार्यकाळात लोकांची अडचण लक्षात घेऊन राजुरा – बामणी मार्गावरील रेल्वे उडण पुलाची निर्मिती केली. माजी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या माध्यमातुन पर्यटन विकासाच्या दृष्टीने मानिगड किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर आदि क्षेत्रात विकास कामे पूर्ण केली. शिवाय विविध विकास कामे पूर्ण केली. राजुरा येथे १०० खाटी उपजिल्हा रुग्णालय मजूर करून कोरोन काळात त्याचे लोकार्पण केले आहे शवनिछेदन यंत्राने साठी १ कोटी २८ लक्षाचा निधी मंजूर केले आहे तर कोरोना काळात रुग्णाची गैसोय लक्षात घेऊन राजुरा विधानसभा क्षेत्रात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ८ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. एकूण १०० कोटी ५९ लक्ष रुपये निधी मंजूर करून क्षेत्रात विकासकामांना गती दिली आहे. यात २०२० – २०२१ च्या अर्थसंकल्पात ५४ कोटी ३९ लक्ष, ग्रामविकास निधी अंतर्गत ७ कोटी २१ लक्ष, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत २२ कोटी ३२ लक्ष, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ६ कोटी ८५ लक्ष, आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ७ कोटी ६ लक्ष, वसंतराव नाईक तांडा वस्ती अंतर्गत १ कोटी ४९ लक्ष, ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत १ कोटी २७ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे. तर एल डब्ल्यू ई अंतर्गत राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी येथे १८४ कोटी रुपयांची विकासकामे प्रगती पथावर आहेत. राजुरा नगरपरिषद अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजना व दलित वस्ती सुधार योजनाच्या माध्यमातुन ६ कोटी रुपये निधीचे विकास कामांना सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या शुभ पर्वावर नैसर्गिक आपत्तीमुळे, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजुर यांना महाराष्ट्र शासनाकडून १३ कोटी ५६ हजार रुपये मंजूर करून लाभ मिळवुन दिला. तसेच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या २१६६ मजुरांना २९ लाख ८१ हजार रुपयाची आर्थिक मदत मिळवुन दिली.
क्षेत्रात पर्यटन विकास हे माझे स्वप्न असून त्यामुळेच अमलनाला मध्यम प्रकल्प पर्यटन विकासाकरिता ७ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला, वैशिष्टय़पूर्ण योजने अंतर्गत राजुरा, गडचांदुर नगर परिषद, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, नगर पंचायतला १७ कोटी, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी क्रीडा संकुल निर्मीतीकरीता २३ कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत राजुरा, कोरपना, गोंडपिपरी येथे २५ कोटी, गोंडपिपरी तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत बांधकामाकरीता १५ कोटी, पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय राजुरा ५ कोटी, राजुरा, गडचांदुर, कोरपना, गोंडपिपरी येथे ऑक्सीजन प्लांट निर्मितीकरीता ३ कोटी, गडचांदूर नगरपरिषद, गोंडपिपरी, कोरपना, जिवती नगरपंचायत येथे अग्निशामक वाहनाकरिता ३. ४८ कोटी, नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत २ कोटी, खनिज विकास निधी अंतर्गत गडचांदूर ऐतिहासीक बुध्दभुमी जवळील परीसरात वाचनालय व इतर बांधकामासाठी १.५० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
राजुरा पंचायत समिती च्या नविन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी २६ कोटी, गोंडपिपरी पंचायत समिती इमारत बांधकामासाठी २० कोटी, मानिकगड किल्ला – १० कोटी , सिध्देश्वर मंदिर – १० कोटी, सोमेश्वर मंदिर – ५ कोटी रुपये निधी जतन व दुरुस्ती साठी मागणी केली आहे. या व्यतिरिक्त अनेक विकासकामे येणाऱ्या काळात पुर्ण करण्याचा मानस आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, सं. गां. नि. यो. अध्यक्ष साईनाथ बतकमावार, नगरसेवक हरजितसिंग संधू अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सय्यद सकावत अली, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, अभिजीत धोटे, शंतनु धोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे, शहराध्यक्ष अशोक राव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजुरा विधानसभा काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केले.