लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕एपीएमसीची संशयास्पद भूमिका – हंसराज अहीर*
चंद्रपूर:- महाराष्ट्रात सर्वत्रा सोयाबिन उत्पादक शेतकरी आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबिन पीक महिणाभरापूर्वीच शेतकऱ्यांच्या घरी आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्याने कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर व राजुरा येथे शेतमाल तारण योजना सुरू आहे व या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी आपले नंबर सुध्दा लावले असतांना 15 दिवसाचा कालवधी लोटुनही एपीएमसीने हमाल कमतरतेचा बहाना करून तारण योजनेचे सोयाबिन बोलावले नाही. दिवाळीचा सन जवळ असल्याने शेतकÚयांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना सोयाबिन विकावे लागत आहे. खासगी खरेदीकरीता हमाल उपलब्ध आहे आणि तारण चे सोयाबिन करीता हमाल नाही यावरून एपीमएसीची भूमिका संशयास्पद वाटते असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
तारण योजनेत ज्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल ठेवायचा आहे ते शेतकरी एपीएमसीच्या नाकर्तेपणामुळे त्रासुन आर्थिक अडचणीमुळे शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने एपीमएसी व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्याचे सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
सोयाबिनचे उत्पादन एकरी कमी आलेले असुन त्यातल्यात्यात खरेदीस टाळाटाळ हे दुहेरी नुकसान सोबत शेतकऱ्यांचे शोषण आहे याची त्वरीत दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी डीडीआर व संबंधीतांना सुचना द्याव्यात अशी सुचना प्रशासनास केली.