स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे बालोत्सव 2021 थाटात संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारत हा

⭕*अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचा नाविण्यपूर्ण उपक्रम :
,,,,,,,,,,,,
⭕दिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी केला उत्सव
*,,,,,,,,,,,
गावाची दिवाळी शालेय बालोत्सवाने सुरू.
,,,,,,,,
⭕*दिवाळी सुट्टीत मुलांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे हे कौतुकास्पद कार्य आहे- गटशिक्षणाधिकारी विजय परचाके.
*,,,,,,,,,,,,
⭕अनेक शाळांना एकत्र करुन मोठ्या प्रमाणात बालोत्सव घेणार- श्रीकांत कुंभारे.
राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत असून त्यात भर पडली ती शालेय विद्यार्थ्यांचा बालोत्सव 2021 च्या कार्यक्रमाची. दिनांक 29ऑक्टोबर ला स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) आणि अंबुजा सिमेंट फाउन्डेशन उपरवाही यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मंगी (बु) येथील विद्यार्थ्यांसाठी बालोत्सव 2021 मोठया थाटात साजरा करण्यात आला. मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व सुट्टीत शालेय चैतन्य कायम राहावे यासाठी अंबुजा सिमेंट फाउन्डेशन उपरवाही यांनी या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे दिवाळी सुट्टीत आयोजन केले. शाळेतील व गावातील विद्यार्थ्यांनी गंमतीचा दिवस म्हणून आनंद घेतला. या बालोत्सव 2021 मध्ये चेहरे रंगविणे, टोप्या बनविणे, आकाश कंदिल बनविणे, खेळातून शिक्षण, भाषा-गणित खेळ, शब्द कोडे, एक मिनीट शो, गीत संगीत- कृतीयुक्त गायन, कोण बनेगा ज्ञानवीर इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केलेले होते. दिवाळी सुटटी गावात व शाळेत शैक्षणिक आनंददायी उत्सवाचे वातावरण तयार झालेले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन व पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजुरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परचाके होते तर उदघाटक म्हणून अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे हे होते. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकर, श्रीराम मेश्राम, संजय हेडाउ, केंद्रप्रमुख शेषराव वानखेडे, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव, उपाध्यक्ष सुमनताई येमुलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहपतराव कुळमेथे, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, जि.प. चे माजी सदस्य भिमराव पा. पुसाम, माजी सरपंच रसिकाताई पेंदोर, माजी उपसरपंच वासुदेव चापले, सोनबत्तीताई मडावी, तंटामुक्त समितीचे माजीअध्यक्ष मोतीराम पा. पेंदोर, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे शिक्षण समन्वयक सरोज अंबागडे, ग्रामसेवक गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, शंकर तोडासे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून बाबा कोडापे, विषय शिक्षक शेणगाव, संदिप कोडेकर, विषय शिक्षक चनाखा, किशोर हजारे अंबुजा सिमेट फाउन्डेशन, मंगला चांदेकर, बबीता तावाडे, शैला मडावी यांनी मोलाचे योगदान देवून कार्यक्रम यशस्वी केला.
याप्रसंगी शिक्षण विभागातील अधिकारी व अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे अधिकारी यांनी गावाची पाहाणी करुन केले कौतुक.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विषय शिक्षक सुधीर झाडे यांनी केले तर आभार सहा. शिक्षक मारोती चापले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सहा. शिक्षक श्रीनिवास गोरे, पंडीत पोटावी, अंगणवाडी सेविका शारदाताई क्षिरसागर, भिमबाई कन्नाके, ग्रा.प. कर्मचारी नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, डाटाएन्टी ऑपरेटर बालाजी मुंडे, रोजगारसेवक दिनेश राठोड तथा कुळसंगे, फुलाबाई सिडाम, भाग्यश्री मरस्कोल्हे, संगीता रोहणे, रंजना घुगुल यांनी मोलाचे सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *