By. ÷Shankar Tadas
गडचांदूर,,
स्थानिक सावित्रीबाई फुले विद्यालयातील वर्ग ९वी व १० वी च्या विद्यार्थिनींना स्व सुरक्षेविषयी व सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
इंटरनेटच्या काळात शालेय विद्यार्थिनींवर अन्याय, अत्याचार छेडखानी, अशा प्रकारचे अनेक प्रकरणे समोर येत आहे या पार्श्वभूमीवर शालेय मुली स्वतःला असुरक्षित समजत आहेत. मुलींना स्वतःची सुरक्षा कशी करावी याविषयीची माहिती नसल्यामुळे व सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे त्यांच्या करिअरचे नुकसान होत आहे, त्यामुळे मुलींनी स्वतःची सुरक्षा स्वतः करावी व कशी करावी याबाबतचे सखोल मार्गदर्शन गडचांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांनी केले त्यांनी मुलींना अडचणी प्रसंगी ११२ या नंबर वर कॉल करून पोलिसांची मदत घ्यावी असे सांगितले.तसेच मुलींनी स्वतःविषयी अन्यायाचा प्रतिकार करावा यादृष्टीने आत्मरक्षणाचे व कराटेचे प्रशिक्षण घ्यावे असेही मार्गदर्शन केले तसेच मुलींनी पोलिसांची मदत घ्यावी असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते, त्यानीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे यांनी प्रास्ताविक केले , वासेकर यांनी शिस्ती बद्दल व व्यायामाबद्दल चे महत्व सांगितले तर पोलीस विभागाच्या सुषमा अडकिने( WPS)यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले या कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व वर्ग ९वी १० वी च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या .सदर कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले.
,,