लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,
कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरात मागील काही दिवसात संततधार पावसाने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून कृषी विभाग किंवा शासनाकडून काही मदत मिळेल का या प्रतीक्षेत शेतकरी आहेत,
या पावसाने 12 एकर मध्ये 100 किंटल
अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 10 किंटल पिकले ते सुद्धा पन्नास टक्के चांगले आहे त्या मुळे भाव सुद्धा मिळणार नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत, काही शेतकऱ्यांनी तर कापनी करण्या ऐवजी सरळ ट्रॅक्टर फिरवलं आहे,परंतु शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरू झालेली नाही , पंचनामे नाहीत, त्यातही अनेकांनी पीकविमा काढलेला नाही, त्या मुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत,
शासनाने या अपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी एकमुखी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे