लोकदर्शन ÷ मोहन भारती
राजुरा :– रमाबाई नगर राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यात अध्यक्षपदी कांचन बारसिंगे यांची तर उपाध्यक्षपदी वर्षा वरकडे व गीता टेंभुर्णे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी अर्चना देवगडे, सहसचिवपदी शारदा जगताप यांची तर सदस्य म्हणून सुमित्रा कुचनकर, मीना खंडाते, संगीता वाघमारे, किर्ती मून, रूपा गोगलवार, निवलकरताई, रुपा लांडगे, लता वाघमारे आदींची निवड करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, माजी नगरसेविका प्रियदर्शनी उमरे यासह रमाबाई नगर येथील अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुमित्रा कुचनकर यांनी केले.