By : Lokdarshan
अंमली पदार्थाच्या सेवनाचे मी समर्थन करणार नाही .पण मुळावर घाव घातल्याशिवाय अंमली पदार्थ विक्री बंद होणार नाही ..पोलीस जे पकडतात ते 2, 4 ग्राम खिशात टाकून विकणारे ..बडे मासे यंत्रणेला माहिती नसतात असा भागच नाही .. सरकारी सेवेतील सर्वच क्षेत्रातील मांजरी ,बोके गुपचूप दूध पितात ..ते पितांना डोळे मिटतात अन स्वतः समज करून बसतात की कुणी बघितले नाही ..बघणारे अनेक असतात ..अदानी बंदरावर 3हजार कोटीचे ड्रग सापडले ..ते बंदर जर कुण्या सामन्याचे असते तर सरकारचे एन सी बी अधीकारी दररोज घराच्या उंबरठ्यावर उभे राहून ओरडले असते ..है क्या घरमे .अडाणी यांच्या उंबरठ्यावर जायला दम पाहिजे ..त्यांची औकात नाही ..सरकारी यंत्रणेला माहिती आहेत त्यांचे दोन दरवान कोण ..एनसीबीने अलीकडे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट केले ..टार्गेट मी यासाठी म्हणेल की दीपिका पदुकोण प्रकरण याच श्रेणीतील ..नंतर त्या प्रकरणाचे काय झाले हे माझ्याकडे येणाऱ्या एका मित्राला मी विचारले तर तो मला म्हणाला ,जाने देना भाऊ ..माझा हा मित्र सीबीआयच्या एका बड्या अधिकाऱ्याचा कौटुंबिक मित्र आहे ..त्यामुळे येथे त्यावर फारसा किस पाडण्याची गरज नाही .. आता कालपरवा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आयर्न याला रेव्ह पार्टीत ड्रग प्रकरणी अटक केली …एनसीबीने त्याला इकडून तिकडून फिरवून त्याची मारबत काढली अन कोर्टाने त्याची रवानगी तुरुंगात केली …,आम्हीही त्याच्या संदर्भात चवीने बातम्या छापल्या ..पण कुणी त्या छापतांना दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या वंशाचा दिवा राहुल महाजन यांच्यावर एनसीबीने तेंव्हा काय कारवाई केली होती यावर प्रकाश टाकला नाही .. यासंदर्भात साधी आठवण काढली नाही ..वडिलांच्या अस्थी शिरविण्यासाठी नेताना राहुल महाजनने सरकारी बंगल्यात ड्रग पार्टी केली अन यात एकाचा मृत्यु झाला होता ..या संदर्भात अटलबिहारी वाजपेयी यांना तेंव्हा एक पत्रकाराने प्रश्न विचारला तर ते म्हणाले , जवान खून है ..पैर फिसल जाता है .. आता आयर्नच्या संदर्भात तो नियम लागू होणार नाही ..त्याचा बाप अभिनेता आहे राजकारणी नाही ..राहुल महाजन याचे रक्त तेंव्हा जवान खून होते तर आयर्नचे आज म्हातारे रक्त आहे काय .. तेंव्हा राहुल महाजन बापाच्या पैशावर मस्ती करीत असल्याचे अनेकांनी अनुभवले .आजही तो तेच करतो आहे .. चवथ्या बायकोने पोलिसात त्याची तक्रार केली ..त्याच्याकडे करिअर वगैरे भाग तेंव्हा नव्हता अन आजही नाही …पण आज आयर्न खानचे करियर संपविण्यासाठी सारी धडपड दिसत आहे ..त्याने ड्रग घेतले नाही ,वाटले की नाही हे कोर्टात स्पष्ट होईल पण एनसीबी मात्र जोमाने कामाला लागली ..लागली की लावली हे लपून नाही ..आर्यनचे करिअर बेस्ट आहे ..लंडनच्या सेव्हन ओक तसेच भारतातील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल मध्ये तो टॉपर होता ..कॅलिफोर्नियात त्याने सिनेमा निर्मितीचे प्रशिक्षण घेतले ..वालीवूडच्या बड्याना जे जमले नाही तो स्पार्क आयर्न मध्ये दिसला ..त्याने दोन सिनेमात आपला आवाज दिला ..द इंक्रेडीबलस चे हिंदी व्हर्जन हम लाजबाब या चित्रपटात त्याने प्रथम आवाज दिला ..लायन किंग चित्रपटात दोघे बाप बेटे आवाजात चमकले ..त्याचे खूप कौतुक झाले ..आयर्न केवळ सिनेमातच नाही तर तायककोंदात तो उत्तम खेळाडू आहे ..आयर्नने मार्शल आर्ट शिक्षण पूर्ण केले ..2010च्या एक स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक मिळविले … ड्रगचे व्यसन लागलेल्या मंडळीला शिक्षा नको हे माझे व्यक्तिगत मत आहे..त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न हवा ..अंमली पदार्थांचे सेवन शिक्षा ठोठावून थांबणार नाही ..भारतात ड्रग बाळगणे व त्याचे सेवन गुन्हा आहे ..समुपदेशन हा चांगला मार्ग आहे ..ड्रग हा जागतिक चिंतेचा विषय आहे ..भारताच्या अंमली पदार्थ विरोधी कायद्यातील 35 अ कलमाअंतर्गत आरोपी समुपदेशन व वैद्यकीय उपचारातून बरा होतो याची खात्री केली जाते .ड्रग मध्ये सापडला की त्याला सुधारायचं की बिघडवायच हा विचार झाला पाहिजे ..भारतात पंजाब व ईशान्य भागातील राज्यांत 78 टक्यावर तरुणांनी कधी ना कधी ड्रग चे सेवन केले असा एक अहवालही प्रकाशित झाला ..भारताच्या सिक्कीम मध्ये तर ड्रग चे सेवन गुन्हाच नाही ..