By : Mohan Bharti
राजुरा येथे भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबीर, स्वयंचलित सायकलचे वितरण
राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा, बामनवाडा, कोरपना, गडचांदूर, नांदाफाटा येथे विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजुरा तालुक्यातील जनतेला विषयतज्ञांच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीर तीन दिवसाचे राहणार असून पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी, दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया व तिसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया पश्चात काळजी घेतली जाईल. नोंदणी कक्ष सकाळी ८.०० वाजेपासुन सुरू होईल.शिबीरात भिषक (फिजीशियन), शल्य चिकित्सक, बालरोगतज्ञ, स्त्रिरोग तज्ञ, रेडीओलॉजिस्ट, त्वचारोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्रतज्ञ, दंत चिकित्सक, नाक, कान व घसा तज्ञ उपस्थित राहतील. शल्य चिकित्सक रूग्णांची तपासणी व निदान करून दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करतील. त्यामध्ये हायड्रोसिल, हर्निया व शरीरावरील गाठीचे, फाटलेले कान शिवणे इत्यादी शस्त्रक्रिया करण्यात येतील. शालेय मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. मधुमेह, उच्च रक्तदाब, तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर याची तपासणी करून निदान करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उद्घाटक खासदार सुरेश उर्फ बाळुभाऊ धानोरकर, विशेष अतिथी उपसंचालक आरोग्य सेवा नागपुर डॉ. संजीव जयस्वाल, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष अरूण धोटे सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार, तहसिलदार हरीश गाडे, गटविकास अधिकारी आसुतोष सपकाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ लहू कुलमेथे, यासह अन्य मान्यवर असणार आहेत. आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑक्टोबर २०२१ ला सकाळी ९.०० वाजता उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आरोग्य शिबीर, ९ :३० वाजता आॅक्सिजन प्लांटचे उद्घाटन, १० वाजता बामनवाडा येथील बालोद्यान लोकार्पण, १० : ३० वाजता इन्फंट जिजस हायस्कूल, राजुरा येथे विकलांग व्यक्तींना तीन चाकी स्वयंमचलीत सायकल चे वितरण, ११ : ३० वाजता बालाजी सभागृह गडचांदूर येथे नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर, ई सातबारा वितरण, १२ :३० वाजता नांदाफाटा येथे रक्तदान शिबीर, २ वाजता श्रीकृष्ण मंगल कार्यालय कोरपना येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन गरजूंनी आरोग्यविषयक सेवा, स्वयंचलित सायकल, ई सातबारा व अन्य सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन राजुरा, कोरपना तालुका काँग्रेस, सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, किसान सेल, ओ. बि. सी. विभाग, अनु. जाती जमाती विभाग, अल्पसंख्याक विभाग, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे वतीने करण्यात येत आहे.