लोकदर्शन👉मोहन भारती
गडचांदूर,,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,मानोली (खुर्द)येथे 5 ऑक्टोबर ला वन्य जीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून लेझीम, ढोल,ताशे वाजवत कोविड नियमांचे पालन करत वन्य जीव स्वसंरक्षण, स्लोगन,घोषणा देत, जनजागृती केली,याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक, महिला, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, सर्व शिक्षक, प्रभातफेरी मध्ये सहभागी झाले होते,
प्रभातफेरी विसर्जित झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी होत्या, उद्घाटन केंद्रप्रमुख विलास देवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक जि, व्ही, पवार,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शंकर रामटेके, जिल्हा परिषदेचे सदस्य नानाजी आदे,वन क्षेत्र सहाय्यक ब्रम्हटेके,ताकसांडे,तांबुळगे,आकाश राठोड, रविंद्र कोडापे, तानु पाटील,नानाजी उदे,अनिल मादाळे,बंडू उदे,संतोष वसाके, बालाजी बोढे,,होते,
सर्वप्रथम अतिथीनि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली,याप्रसंगी उपस्थित अतिथीनि मार्गदर्शन केले, कार्यक्रमा चे आयोजन वनपाल सोयाम,व दुर्योधन वाडगुरे यांनी केले, संचालन राजेश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्रह्मटेके यांनी केले,याप्रसंगी गावकरी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते,