लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदुर
मराठा सिमेंट वर्क्स (अंबुजा सिमेंट कंपनी) ही कंपनी उपरवाही तह कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे स्थित असून माणिकगड सिमेंट कंपनी ( अल्ट्रा टेक सिमेंट) ही गडचांदुर येथे स्थित आहे. दोन्ही कंपन्यांनी शासनाकडे परवानगी घेतांना आपल्या कंपनी परिसरात ट्रक चे पार्किंग यार्ड दाखविले आहेत. दोन्ही कंपन्यांनी ४५०-५०० ट्रॅक चे सुसज्ज पार्किंग यार्ड आपल्या मंजूर नकाशात दाखविले आहेत शासनाने सदर पार्किंग यार्ड कागदोपत्री दाखवून असल्याने दोन्ही कंपनीना सिमेंट निर्मिती व रस्त्याद्वारे वाहतुकीची परवानगी दिलेली आहे.
परंतु अंबुजा सिमेंट येथे येणारे ट्रक हे अंबुजा फाटा ( हरदोना ) येथे तर माणिकगड कंपनीचे ट्रक हे गडचांदुर येथील राजीव गांधी चौक ते संताजी जगनाडे महाराज चौक ते ढुमने ले आऊट पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात.
या बाबत या आधी सुद्धा तक्रार दिली असता पोलिस विभागातर्फे माणिकगड कंपनी ला नोटीस/ सूचना केल्या आहेत परंतु काही दिवसांनी स्थिती पुन्हा जैसे थे होत असते.
सदर अवैध पार्किंग मुळे कित्तेक अपघात होऊन मनुष्य हानी सुद्धा झालेली आहे.
सिमेंट कंपनी मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक्स ची संपूर्ण पार्किंग जवाबदारी ही सदर कंपन्यांची असून सुद्धा नियमांचा भंग करून सदर जड वाहने ट्रक्स रस्त्याच्या दुतर्फा पार्क केली जातात. दोन्ही कंपनी द्वारे त्याच्या येथे ट्रान्सपोर्टर कंपनी चे नाव समोर करून या गंभीर विषयावर पडदा टाकण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो परंतु कंपनी मध्ये येणारे वाहन जर रस्त्यावर अवैधपणे उभी राहत असतील तर तो सदर सिमेंट कंपनी आणि ट्रान्सपोर्टर मधल्या कराराचा भंग असून त्यावर सदर वाहतूकदार ट्रान्सपोर्ट कंपनी वर सदर कंपनीने कारवाई करणे संयुक्तिक आहे. न ऐकल्यास करार भंग केल्यामुळे त्यांचेकडून ट्रान्सपोर्टींग चे काम काढून इतरांना देणे आवश्यक आहे. परंतु तसे होतांना दिसत नाही.
माणिकगड सिमेंट (अल्ट्रा टेक) गडचांदुर व मराठा सिमेंट वर्क्स (अंबुजा सिमेंट) सोबतच परिसरातील दालमिया सिमेंट ( मुरली अग्रो) नारंडा व ACW अल्ट्राटेक कंपनी आवारपुर यांना प्रशासन ने सूचना करावी,की त्यांच्या कंपनी मध्ये येणारी जाणारी वाहने ही कंपनी पार्किंग यार्ड मध्येच उभी करावी, रस्त्यावर उभी करू नये अन्यथा सदर कंपनी वर दिलेली शासकीय परवानगी रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नगरसेवक तथा गटनेते यांनी जिल्हाधिकारी ,चंद्रपूर,यांचेकडे निवेदनात केली आहे,निवेदनाच्या प्रति पोलीस अधीक्षक,चंद्रपूर, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर,उपविभागीय परिवहन अधिकारी,चंद्रपूर यांना पाठविण्यात आल्या आहेत,