लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*🔸शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने निधी वितरण करणार : सहकार विभागाच्या प्रधान सचिवांचे आश्वासन*
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना 2019 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 1921 शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी कर्जमुक्तीचा लाभ देण्याच्या दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार दिले. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने दिवाळीच्या आधी निधी वितरण करण्याचे आश्वासन सहकार विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी दिले.
चंद्रपुर जिल्ह्यातील 1921 शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना 2019 अंतर्गत कर्जमुक्ति चा लाभ मिळण्याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन मुंबई येथे बैठक बोलाविली होती. या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार , वित्त विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्ता , कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह अन्य अधिका-यांची उपस्थिति होती.
चंद्रपुर जिल्ह्यातील 1921 शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजनेच्या लाभापसुन वंचित असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विस्तृत आढावा घेतला.
महात्मा फुले कर्ज वाटप योजनेअंतर्गत एकूण 32.51 लक्ष खाते पात्र असून 31. 90 लक्ष खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले त्यापैकी 31.51 लक्ष कर्ज खात्यांना 20,109 कोटी लाभ वितरण करण्यात आले.अद्याप 63 हजार 517 खात्यांना लाभ द्यावयाचा असून त्यासाठी 858 कोटी आवश्यक निधीची गरज आहे.
यावर्षीची अर्थसंकल्पीय तरतूद 175 कोटी रुपयाची असून उर्वरित 683 कोटी रुपये निधी उपलब्ध झाल्यास हा संपूर्ण विषय निकालात निघेल. त्याकरिता खातेदारांची तपासणी मोहीम पुढील महिन्यात पूर्ण करण्यात येईल. अशी माहिती विभागाच्या अधिका-यांनी दिली.
शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने दिवाळीच्या आधी निधी वितरण करण्याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.