लोकदर्शन गडचिरोली👉मोहन भारती
LLB 3yrs CET Entrance Exam. दिनांक २ मे २०२५ रोजी घेण्यात येत आहे. याच दिवशी व तारखेला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या उन्हाळी २०२५ B.A, B.Com., B.Sc. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी LLB 3 yrs. अभ्यासक्रमाला पुढील सत्रात प्रवेश मिळण्यासाठी सीईटी प्रवेश परीक्षेला, प्रवेशित झालेले आहेतअशा विद्यार्थांची प्रवेश परीक्षा दिनांक २ मे २०२५ रोजी घेण्यात येत आहे. दिनांक २ मे २०२५ रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा उन्हाळी २०२५ च्या परीक्षा घेण्यात येत आहेत.बीए अंतिम वर्षाच्या ६ व्या
सेमिस्टर चा मराठी विषयाचा पेपर दिनांक २ मे २०२५ रोजी असल्यामुळे,एकाच तारखेला व एकाच वेळेला असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा व हिताचा विचार करता ज्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रामध्ये एलएलबी ला प्रवेश घ्यायचा असल्यामुळे सिईटी देणे बंधनकारक आहे. परंतु विद्यापीठ विद्यापीठ परीक्षांच्या बीए ६ व्या सेमिस्टरचा मराठी विषयाचा पेपर दिनांक २ मे २०२५ रोजी आहे. दोन्ही परीक्षा एकाच तारखेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेला बसता येईल. करिता विद्यार्थ्यांची गैरसोयी होऊ नये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षांमध्ये बीए ६ वा सेमिस्टर मराठी विषयाचा पेपर जे विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेला प्रवेशित झालेली आहेत, त्यांना पुन्हा पेपर देण्याची संधी देण्यात यावी. अशी मागणी विद्यापीठ विकास मंचाचे ,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्यवस्थापन परिषद – अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ.प्रशांत बोकारे यांच्याकडे केलेली होती. या मागणीला यश प्राप्त झालेले आहे.अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची विनंती मा.कुलगुरूंनी डॉ. प्रंशात बोकारे यानी मान्य केलेले आहे .जेणेकरून विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. पुढील कोणत्याही शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घ्यावी. सिईटी परीक्षेला प्रवेशित विद्यार्थ्यांची परीक्षा पुढील तारखेला घेण्यात यावी. विद्यार्थ्यांना संबधित विषयाची परीक्षा देण्याची संधी दयावी.अशी मागणी विद्यापीठ विकास मंचचे गुरुदास कामडी यानी एका निवेदनाद्वारे केली होती.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड परीक्षा दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महाविद्यालयातील काही विद्यार्थी या परीक्षेला प्रवेशित झालेले होते. त्यापैकी नियमित अभ्यासक्रम NEP 2020 बीएससी सेकंड सेमिस्टर चा विद्यापीठ परीक्षेचा पेपर याच दिवशी व तारखेला असल्यामुळे संबंधित विषयाचा पेपर विद्यार्थी देऊ शकले नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांना हा पेपर देण्याची एक संधी देण्यात यावी. जे विद्यार्थी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड परीक्षेला प्रवेशित झालेले होते अशा सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे याच दिवशीचा पेपर पुढे घेण्यात यावा यासाठी निवेदन सादर केलेले होते या निवेदनाची प्रत विद्यापीठाचे मा. परीक्षा नियंत्रक यांच्याकडे गुरुदास कामडी यानी पाठविलीआहे. करिता संबंधित विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेण्यात यावा व अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचा पेपर देण्याची एक संधी देण्यात यावी .
विद्यापीठाकडून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात अशा विद्यार्थ्यांना आपण परीक्षा देण्यात देण्यासाठी संधी उपलब्ध करून देत असतो. याच नियमाप्रमाणे उन्हाळी २०२५ परीक्षा कालावधीमध्ये विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा व रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देणे शक्य होत नसल्यामुळे जे विद्यार्थी अशा परीक्षांना प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचा पेपर देण्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या अनुषंगाने विद्यापीठ विकास मंचचे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्यवस्थापन परिषद – अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी
लेखी निवेदनाद्वारे मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे मागणी केलेली होती. व स्वतः दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा करून संबंधित विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व भविष्याचा विचार करून विद्यापीठ परीक्षा देण्यासाठी संधी देण्याची मागणी केलेली होती.गुरुदास कामडी यांच्या मागणीला यश आलेले असून ,अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर देण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मा. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितलेले आहे .या संदर्भात लवकरच नोटिफिकेशन विद्यापीठाकडून जारी करण्यात येत आहे . यासाठी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु व परीक्षा नियंत्रक यांना निर्देश देण्यात आलेले आहे.
*गुरुदास मं.कामडी*
व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली