*बच्चू कडूंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा होणार सन्मान ‘प्रहार पक्षाचा उपक्रम* *चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रहार कार्यकर्त्यांनी विभागीय मेळाव्यास उपस्थित रहावे जिल्हा प्रमुख बिडकर यांचे आव्हानं*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित संताजी धनाजी सन्मान पुरस्कार सोहळा उद्या दिनाक नागपूर येथे आयोजन करण्यात येत आहे. राज्यात प्रथमच कोण्या राजकीय कार्यकर्त्या चा सन्मान स्वराज्य स्थापनेसाठी जीवन खर्ची घातलेल्या, इतिहास गाजवलेल्या सुभेदार संताजी ,धनाजी या महान योद्धा च्या नावाने पुरस्कार देण्यात येत आहे.ही संकल्पना बच्चुभाऊ कडू यांची आहे .पक्षाचा कार्यकर्ता समाजासाठी ,पक्षा साठी रात्रंदिवस झटत असतो अनेक समाज हिताचे आंदोलन करून, रक्तदान करून ,स्वतःचे जिव टांगणीला लावून, गुन्हे दाखल करून घेत असतो या सर्वांचा सन्मान व्हावा ही कल्पना बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने सर्व काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा म्हणून छत्रपतीच्या राज्यातील सूर सेनानी संताजी धनाजी यांच्या नवाने पुरस्कार देवून कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात येणार आहे कार्यक्रमला प्रहार जनशक्ती पक्ष्याचे सर्वेसर्वा माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू सोबत संताजी धनाजी सन्मान पुरस्काराचे नागपूर विभागीय निरीक्षक संजय देशमुख ,नागपूरचे जिल्हा प्रमुख रमेश कारमोरे,भंडारा अंकुश वंजारी,गोंदिया महेंद्र भांडारकर गडचिरोली निखिल धर्मीक चंद्रपूर सतिश बिडकर, शेरखान पठाण नागपूर शहर चे अमोल इसपांडे,तसेच दिव्यांग चे जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहे.
हा दिमाखदार सोहळा कविवर्य सुरेश भट सभागृहात मंगळवार दि २९ एप्रिल २५ ला सकाळी १०:०० वाजता पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here