लोकदर्शन गडचांदुर 👉अशोककुमार भगत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त गडचांदुर येथे संयुक्त जयंती उत्सव समिती व समता सैनिक दलाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅलीचे तसेच पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. यात शेकडो युवक-युवतींनी भाग घेत बाबासाहेबांना अभिवादन केले.
सकाळी शहरातील आंबेडकर भवन प्रांगणातून रॅलीला सुरूवात झाली. समता सैनिक दलाच्या गणवेशातील कार्यकर्त्यांनी अनुशासनबद्ध पथसंचलन करत संपूर्ण गडचांदुर नगरात भ्रमण केले. रॅली दरम्यान ढोल-ताशांचा गजर, जयभीमच्या घोषणा, तसेच बाबासाहेबांच्या विचारांची प्रचारणा करणारे फलक वातावरण भारावून टाकत होते.
दरम्यान, संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अध्यक्ष प्रा.डॉ.हेमचंद दुधगवळी यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण पार पडले. नंतर भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख बुद्ध विहारांमध्ये जाऊन अभिवादन करत विविध आंबेडकर भवन, बुद्ध विहारे अशा ठिकाणांची परिक्रमा केली. विविध वॉर्डात पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.
या उपक्रमात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शहरातील अनेक सामाजिक संस्थांनीही रॅलीला पाठिंबा दिला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयुक्त जयंती उत्सव समिती व समता सैनिक दलाचे हेमचंद दुधगवळी,सचिन कांबळे,प्रशांत खैरे,श्रावण जीवने, बादल चांदेकर, कवडू सोडवले,देविदास मुन,रवि पथाडे, विक्की मुन,राहुल निरंजने,पद्माकर खैरे,महेंद्र ताकसांडे,प्रेम वानखेडे,रवि ताकसंडे, देवानंद मुन, अशोककुमार भगत,विश्वास विहिरे,प्रा.करमणकर,समाधान सोनकांबळे, शैलेश लोखंडे, रोशन मेश्राम, सुभाष सिरटकर, नितीन भगत, आशा सोडवले,सीमा खैरे,बेबी वाघमारे,शीला निरांजने यांनी परिश्रम घेतले.
गडचंदुरमध्ये झालेली ही भव्य मोटार सायकल रॅली व पथसंचलन शहरवासीयांमध्ये एकतेचे आणि सामाजिक जागृतीचे प्रतीक ठरली आहे.