माजी आ. सुभाष धोटे यांची अकोला जिल्ह्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती.

लोकदर्शन👉मोहन भारती

राजुरा :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरीता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती अकोला शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या निरीक्षक पदी करण्यात आली आहे.
अकोला शहर व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या ब्लॉक निहाय बैठका घेऊन जिल्ह्याचे काँग्रेसचे प्रभारी यांना विश्वासात घेऊन १५ दिवसांत ते आपला अहवाल प्रदेश कार्यालयाला सादर करणार आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे श्री. सुभाष धोटे यांच्या प्रदिर्घ राजकीय, सामाजिक अनुभवाचा अकोला जिल्हा काँग्रेस पक्ष संघटन अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here