जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपरवाही शाळेला भेट

By : Shankar Tadas

गडचांदूर :

जि. प. उच्च प्राथमिक शाळा उपरवाही इथे चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन शालेय उपक्रमाची तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली.

शाळेतील स्काउट पथक, कराटे पथक आणि इको क्लब सदस्यांनी मा. साहेबांना पुष्पगुच्छ तथा मानवंदना देऊन साहेबांचे स्वागत केले
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -2 या स्पर्धेत *चंद्रपूर जिल्ह्यात शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल साहेबांनी शाळेचे कौतुक केले
इयत्ता 2 री मधील विद्यार्थ्यांचे मराठी तसेच इंग्रजी वाचन कौशल्य बघून साहेबांनी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली.

शाळेतील नावीन्यपूर्ण विज्ञान कक्ष बघून तसेच 21 व्या शतकातील आधुनिक शिक्षण कोडींग, तसेच डिजिटल शिक्षण Phet simulation, Q आर कोड चा वापर, याबाबत विद्यार्थ्यांनी साहेबांना प्रात्यक्षिक करून दाखविली त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संपूर्ण शालेय परिसर व शालेय उपक्रमाची साहेबांनी विशेष दखल घेऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विनय गौडा साहेब यांच्या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी कश्मीरा संखे राजुरा, पल्लवी आखरे तहसीलदार साहेब कोरपना, विजय पेंदाम संवर्ग विकास अधिकारी कोरपना, सचिन मालवी गटशिक्षणाधिकारीकोरपना, कोहपरे केंद्रप्रमुख केंद्र बाखर्डी अंबुजा फौंडेशन चे बैस, ग्राम पंचायत उपरवाही सरपंच गीता सिडाम, उपसरपंच अनिल कौरासे तथा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक तलांडे, तसेच सर्व समिती सदस्य व मुख्याध्यापक विनोद बेले तथा सर्व शिक्षकांनी शाळेतील उपक्रमाबाबत यशस्वी सादरीकरण केले.

या वेळी अंबुजा फौंडेशन उपरवाही येथील सर्व अधिकारी तसेच सरपंच तथा उपसरपंच तथा सर्व सदस्य ग्राम पंचायत उपरवाही तथा ग्राम विकास अधिकारी व सर्व अंगणवाडी विभाग अधिकारी व सर्व कर्मचारी या सर्वांच्या मदतीने शाळेच्या उपक्रमाची व शैक्षणिक गुणवत्तेची यशस्वी सादरीकरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here