By : Shankar Tadas
राजुरा : शहरातील नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ओळख असली जेष्ठ पत्रकार बाबा बेग यांनी राजुरा येथील सुपर मार्केट हॉल येथे आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळाच्या कार्यक्रमांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपा पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे राजुरा शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाला अधिक बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
राजुरा येथे सचिन भोयर मित्रपरिवार यांच्या वतीने सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र तथा माजी पालकमंत्री व देवराव भोंगळे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन (दि. 15) रोज शनिवारला सायंकाळी सात वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल सुपर मार्केट हॉल राजुरा याठिकाणी करण्यात आला. त्यावेळी राजुरा शहरातील मुस्लिम समाजाचे नामांकित व्यक्तिमत्व, जेष्ठ पत्रकार बाबा बेग यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा टाकून पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे राजुरा शहरात भारतीय जनता पक्ष अधिक बळकट होणार असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, राजुरा तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा महिला महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, राजुरा महिला आघाडीचे शहराध्यक्ष माया धोटे, सोहम बुटले, श्रीकृष्ण गोरे यांची उपस्थिती होती.