लोकदर्शन नाशिक👉मोहन भारती
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अहिरे ॲकॅडमीचे संस्थापक आदरणीय प्राध्यापक डॉ. आनंद अहिरे सर यांनी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा, कवी संमेलन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजित केला. रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता राणी भवन, नाशिक येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे पुस्तकाची आई मा. भिमाबाई जोंधळे, सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. रूपाली पवार, सागर अडगावकर सन्सचे मालक सागर अडगावकर व इतर अन्य मान्यवर उपस्थित होते. या सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत महिला दिनी वैद्यकीय, शासकीय, पोलिस, विधी, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह, मेडल, व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. सौ. शुभांगी गणेश गादेगावकर यांना राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.