स्मार्ट ग्राम बिबी येथे ‘माझी वसुंधरा महोत्सव २०२५’ उत्साहात साजरा

लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपना – जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी ग्रामपंचायतीच्या वतीने ‘माझी वसुंधरा महोत्सव २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले. या महोत्सवात पर्यावरणपूरक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी टेकाम होत्या तर उद्घाटन राजुरा पंचायत समितीच्या माजी सभापती कुंदाताई जेनेकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रामपंचायत अधिकारी धनराज डुकरे, ग्रामपंचायत सदस्या प्रणाली कोरांगे, सोनाली आत्राम, भारती पिंपळकर, दुर्गाताई पेंदोर, लिलाबाई चंद्रगिरी, ग्रामपंचायत सदस्य बंडू नैताम, राजू नन्नावरे, सुरज कुळमेथे, शिवराज बसवंते आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आठवडाभर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंग स्पर्धेत प्रथम प्रणाली पावडे, द्वितीय ललीता मोहितकर, तृतीय विद्या कारवटकर,
पर्यावरणपूरक रांगोळी स्पर्धेत प्रथम मायाताई सोनुले, द्वितीय जयश्री पिदुरकर, तृतीय दिशा जिभकाटे,
पर्यावरणपूरक सौंदर्य आणि अलंकार स्पर्धेत प्रथम लता काकडे, द्वितीय लता मोहितकर, तृतीय सविता सोनटक्के, पोस्टर आणि पेंटिंग स्पर्धेत प्रथम आकांक्षा टोंगे, द्वितीय गायत्री भगत, तृतीय मयुरी कायरकर, बागकाम आणि स्वच्छ अंगण स्पर्धेत प्रथम मायाताई सोनुले, द्वितीय लता काकडे, तृतीय अनिता अतकारे, पर्यावरण आधारित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम प्रणित मोहितकर, द्वितीय अनामिका शील, तृतीय पूर्वी रिठे यांनी क्रमांक पटकाविला.
जागतिक महिला दिन समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम संगीत सखी ग्रुप, द्वितीय स्वामिनी ग्रुप, तृतीय विद्यापीठ आपल्या गावी ग्रुप यांनी क्रमांक पटकाविला.
स्पर्धांचे परीक्षण सचिन गोंगले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा काकडे व साक्षी पाचभाई यांनी केले. या महोत्सवामुळे महिलांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण झाली असून, त्यांना त्यांच्या कौशल्यांना वाव देण्याची संधी मिळाली. ग्रामपंचायत बिबीच्या वतीने विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धकांसाठी कचराकुंडी व प्रेक्षकांना कापडी पिशवीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थ व सहभागी महिलांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here