राष्ट्रसंताचे साहित्य म्हणजे जीवन जगण्याची दृष्टी देणारे ज्ञान भांडार : आ. पायल शंकर

सांगडी येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन

By : Shankar Tadas
कोरपना : राष्ट्रसंताचे साहित्य माणूस या संकल्पनेशी नाते जोडते . त्यांचे साहित्य म्हणजे जीवनसृष्टी देणारे ज्ञानभांडार आहे , ते साहित्य जगणे शिकवते. तसेच राष्ट्रसंतांचे परमशिष्य ब्र. डॉ .मोतीजी महाराज यांनी राष्ट्रसंत साहित्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केला, असे प्रतिपादन आदिलाबाद चे आमदार.पायल शंकर यांनी साहित्य विचार साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी केले. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि सांगडी श्रीगुरुदेव सेवा मंडळ , ग्रामस्थांच्या सहकार्याने कोरपना जवळील सांगडी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचाह समारोप शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष पंढरीनाथ चंदनखेडे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, साहित्य प्रसारक अर्जुन पारूडकर (किल्लारी) , परिषदेचे सरचिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, डाखरे महाराज, कवी अरुण झगडकर (गोंडपिपरी), धम्ममित्र नामदेव गेडकर , चंद्रकांत शहासने (पुणे), स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे आदींची उपस्थिती होती. यावेळी कवयित्री शशिकलाताई गावतुरे (मुल) यांच्या ‘ माह्या झाडीमंदी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पायल शंकर यांच्या हस्ते झाले. संमेलनात तीन ठराव पारित करण्यात आले यांमध्ये राष्ट्रसंतांचे साहित्य तेलंगणा स्टेट मधील शालेय तथा विद्यापीठ अभ्यासक्रमात लावण्यात यावे,सांगडी येथील डॉ. मोतीजी महाराज श्रीगुरुदेव सेवाश्रमाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा,राष्ट्रसंत विचारधारा अध्यासन तेलंगणा स्टेट मधील सर्व विद्यापीठात सुरू करण्यात यावे. समारोपिय कार्यक्रमात बळीराम बोबडे, सुभाष पावडे, उध्दव नारनवरे, सचिन झाडे, इंदिरा कुडे, चेतन ठाकरे, विनायक सोयाम, सतिश देवाळकर, प्रल्हाद खुणे, डॉ. श्रावण बाणासुरे, उध्दव बेलूरकर, डॉ. हर्षानंद हिरादेवे आदींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सकाळच्या सत्रात स्वच्छता अभियान , सामूदायिक ध्यान, याेगासने व निसर्गाेपचार विषयावर विनायक साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. मी अनुभवलेली एक ओवी हा परिसंवाद प्रेमलाल पारधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी. त्यात प्रल्हाद खूणे, विलास चाैधरी, हरिश्चंद्र बाेढे, श्यामसुंदर कारेकर, केवलराम गेडाम, डाॅ. उदार ,महादेव हुलके, गजानन बाेबडे, खुशाल गाेहाेकार,पांडुरंग शेंडे, हुसेन किन्नाके, माेहन वडस्कर, इंदिरा कुडे, तसेच पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी अनुभव कथन केले.त्यानंतर डाॅ. माेतीजी महाराज यांना माैन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . कार्यक्रमाचे नियोजन एड. राजेंद्र जेनेकर , संजय तिळसमृतकर, रविंद्र भेदोडकर , श्रीकांत धोटे, चंदू पाथोडे, शिवाजी भेदोडकर , मनोहर पासपुते , मनोहर बोबडे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here