साई सेवा संकल्प प्रतिष्ठानचा अनोखा महिलादिन

लोकदर्शन 👉मोहन भारती

चंद्रपूर : काही दिवसापूर्वी नवभारत वृत्तपत्रात बातमी आलेली होती की एफएस गर्ल्स कॉलेज समोर असलेल्या एका विधवेचे घर शॉर्टसर्किटमुळे जळालेला आहे नंतर माहिती काढल्यास लक्षात आले की ती महिला प्रतिष्ठानच्या दोन-तीन सदस्यांच्या अगदी जवळची असून संगीता हांडे नाव आहे. घरात 12व्या वर्गात शिकणारी मुलगी असून सोबत एक म्हातारी आई असतें. ही बातमी कळाल्यानंतर प्रतिष्ठान च्या सदस्यांनी तिच्या घराची पाहणी केली असता घराची तर संपूर्ण राख रांगोळी झाली पण सोबतच तिचा संसार ही संपूर्ण उद्ध्वस्त झालेला होता. घरासोबतच मुलीच्या शिक्षणाकरता ठेवलेले पन्नास हजार सुद्धा जाळून खाक आणि ती रस्त्यावर आली याची इथंबूत शहानिशा केल्यानंतर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी एकमतांनी रक्कम गोळा करून तिला लागणारी जीवन उपयोगी वस्तू,,भांडी, किराणा, सोबतच अन्नधान्य आणि काही रोख स्वरूपात मदत आज या महिला दिनाच्या पर्वावर तिला सुपूर्द केली आणि यानंतरही तिला शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले याच अनुषंगाने अशाप्रकारे श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने एक आगळावेगळा महिला दिन साजरा करण्यात आला. सोबतच प्रतिष्ठानच्या सदस्यांना विनंती करण्यात आली की ते कुठल्याही सामाजिक संघटने सोबत कार्यरत असतील त्यांना सुद्धा याबाबत माहित देऊन या ताईला मदत करण्याचे आवाहन केले. आणि ही बातमी देण्याचे तात्पर्य की ही माहिती सर्वसामान्य जनसामान्य पर्यंत पोहोचवावी आणि त्या ताईंना एक मदतीचा हात आपल्या माध्यमातून मिळावा.
यात प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी सहभाग नोंदविला सचिन गाटकीने, प्रकाश नांढा,प्रदीप रणदिवे,दिग्रराज पेंढारकर, कुणाल खनके,रोशन निनावे,भागवत खटी, देवेंद्र लांजे नेमराज पोडे,अनिरुद्ध यादव इंद्रायणी गाटकीने,ममता दादूरवाडे,विद्या रणदिवे,प्रमिला चहारे, आशा यादव,चारुलता पेंढारकर,इत्यादींचा सहभाग लाभला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here