By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील कढोली खुर्द ते कोल्हापूर रस्ता बांधकाम वर्षभर ठप्प होते. रस्त्यावर गिट्टी पसरून लोकांना चालणे कठीण झाले होते. याबद्दल आमदार देवरावदादा भोंगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून चांगलेच खडसावले होते. काम सुरू करीत नसेल तर त्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करा असेही यावेळी सांगितले होते. त्यामुळे हे रखडलेले रस्ता बांधकाम त्वरित सुरू झाले आहे.
कोल्हापूर गुडा येथे जल शुद्धीकरणचे भूमिपूजनाकरिता आमदार आलेले असताना त्यांचे कढोली खुर्द येथील कट्टर समर्थक सुदाम लांडे आणि उपसरपंच विनायक डोहे यांनी सदर रस्ता बांधकाम ठप्प असल्यामुळे लोकांना नाहक त्रास होत असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी आमदारांनी तेथेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला कॉल करून सदर काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या.सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 चंद्रपूर अर्थसंकल्पीय निधी योजने अंतर्गत होत असलेले सदर रस्ता बांधकाम सुरू झाल्यामुळे कढोली खुर्द वासीयांनी आमदार देवरावदादा भोंगले यांचे आभार व्यक्त केले आहे.