कोरपना व जिवती तालुक्यातील सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडयांना मंजुरी : तालुकास्तरीय कर्न्व्हजन्स समितीच्या बैठकीत निर्णय

By : Shankar Tadas
कोरपना : अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ अन्वये अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी यांना कलम ३ (१) अन्वये वैयक्तिक व सामुहिक किवा दोहोंचे धारनाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. अनुसूचित जमातीचे वन निवासी व इतर पारंपारिक वन निवासी यांच्या उत्थानासाठी सामुहीक वन संपत्तीचे निरंतर व समसमान संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामसभेचे बळकटीकरण करण्यासाठी तसेच वनांवर उपजीविका अवलंबून असलेल्या ग्रामीण समाजाला निरंतर व शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देणे, वनांचे व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, संरक्षण व पुनर्निर्मानाकरिता परिणामकारक व कार्यक्षम व्यवस्थापन पद्धत अवलंबिणे आवश्यक आहे.
सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभेने संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तालुका स्तरीय कर्न्व्हजन्स समिती कडे सादर केले होते, याकरिता एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प विभाग, चंद्रपूर कार्यालया अंतर्गत तालुका जिवती तसेच तालुका कोरपना येथे मंगळवार ला तहसील कार्यालयात तालुका कर्न्व्हजन्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीत जिवती तालुक्यातील सामुहिक वनहक्क प्राप्त ८ ग्रामसभांच्या तसेच कोरपना तालुक्यातील सामुहिक वनहक्क प्राप्त १३ संवर्धन व व्यवस्थापन आराखड्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.
सदर बैठकित तालुका स्तरीय कर्न्व्हजन्स समितीचे सदस्य, ग्रामसभा प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here