By : Shankar Tadas
राजुरा :
आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचारी तसेच बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत नियुक्त वाहनचालक व कंत्राटी तत्वावर नियुक्त वाहनचालक यांचे मागील सात महिण्यापासून थकीत वेतन मिळाले नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. याप्रकरणी कंत्राटी कामगारांनी थकीत वेतन मिळवून देण्याबाबत निवेदन देऊन आमदार श्री. देवराव भोंगळे यांना विनंती केली होती.
सदर गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी तत्क्षणीच मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. विपुल विनायक यांना भ्रमणध्वनी करून हे थकित वेतन देण्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी केली होती, त्यानुसार शासनाने सदर थकीत वेतन देण्याकरीता निधी उपलब्ध करून दिला आहे.
आरोग्य सेवेतील हे कर्मचारी रात्रंदिवस जनसेवेत कार्यरत असतात. त्यांचे नियमित वेतन न होणे हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न दिल्याने त्यांच्या कुटूंबीयांवर उपासामारीची वेळ आली होती. हा अन्याय दूर करण्यासाठी आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी
शासनाचे वेळीच लक्ष वेधले आणि बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचारी तसेच बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत नियुक्त वाहनचालक व कंत्राटी तत्वावर नियुक्त वाहनचालक यांचे मागील सात महिण्यांचे वेतन देण्यासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करण्यात आल्याने थकीत वेतनाचा मार्ग आता मोकळा झाला.
या हितकारक निर्णयामुळे कंत्राटी कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत असून त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहे.