By : Shankar Tadas
चंद्रपूर : सामाजिक बांधीलकी जपणारे,
उच्चविद्याविभूषित समाज कार्यकर्ते राजेंद्र गुरुचरणजी मर्दाने यांची पोलीस, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व सामान्यजन यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या आर्यावर्त पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया (रजि.) च्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देत अधिघोषित केले आहे.
राजेंद्र मर्दाने हे मागील जवळपास ३२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून विविध दैनिक, साप्ताहिकांत त्यांनी विपूल लेखन केले आहे. राष्ट्रीय सामाजिक न्याय कृति मंच(रजि.) आणि डॉ. आंबेडकर – वाल्मिकी वेल्फेअर सोसायटी(रजि.)चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, जय हिंद सैनिक संस्था(रजि.) चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ,ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, आनंदवन मित्र मंडळाचे सचिव, पत्रकार सुरक्षा समितीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष असून वरोडा तालुका प्रेस क्लबचे माजी सचिव, न. प.वरोराचे माजी नगरसेवक तसेच विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व शासकीय समित्यांचे सदस्य म्हणून उल्लेखनीय काम करीत त्यांनी आपली आगळीवेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. याव्यतिरिक्त साहित्य, कला, क्रीडा, संगीत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले आहे.अन्याय, अत्याचाराविरोधात लढण्याची मानसिकता, विविध क्षेत्रातील नैपुण्य आणि राष्ट्रीय एकता, एकात्मता,अखंडता राखण्यासाठी असलेली तळमळ पारखून त्यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच माजी सैनिक परिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.