By : Shankar Tadas
नागपूर : नॅशनल स्टुडंट्स यूनियन ऑफ इंडिया म्हणजेच NSUI ने राज्यातील सर्व युनिव्हर्सिटीचे कॅम्पस ऍम्बेस्याडर घोषित केले आहेत. त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून विधी महाविद्यालयाची विदयार्थिनी गौरी मोहन भारतीची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्र राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी नुकतेच जारी केले आहे.