By : Shankar Tadas
कोरपना :
शालेय विद्यार्थी भोजनापासून वंचित राहू नये याकरिता शासनाने मध्यान्ह भोजन सुरू केले आहे. मात्र मागील तीन pमहिन्यापासून शालेय पोषण आहाराचा तांदुळ शाळेपर्यंत पोहचला नसल्याने तब्बल विद्यार्थांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकरणात राजुरा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी गांभीर्याने लक्ष घालून मंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी केलेली आहे.
कोरपना तालुक्यात तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मागील डिसेंबर – २०२४ पासून शालेय पोषण आहार मिळणे बंद आहे. कोरपना तालुक्यात एकूण १७६ शाळा आहेत त्यापैकी जिल्हा परिषदेचा १११ शाळा आहेत. त्यापैकी जवळपास ७० शाळांचे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. पोषण आहाराची समस्या एका तालुक्यापुरती मर्यादित नसून जिल्ह्यात हीच विदारक परिस्थिती दिसून येत आहे.
एकीकडे राज्यात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत शिजवलेला पोषण आहार दिला जातो तसेच केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थांच्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा, वस्तीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे या ठिकाणी सुद्धा शालेय पोषण आहार योजना राबिविली जात आहे. मात्र मागील दोन महिन्या पासून तांदूळच उपलब्ध होत नसल्याचे अनेक शाळेत खिचडीच शिजत नाही.
ही अत्यंत गंभीर बाब शिक्षण विभागाच्या उडवाउडवीच्या उत्तरातून नुकत्याच झालेल्या आमदार आढावा बैठकीत समोर आली आहे.
***
श्रीमती माया सोणवणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. चंद्रपूर यांच्या हलगर्जीपणामुळे डिसेंबर – २०२४ पासूनसंबंधित ऑनलाईन पोर्टलवर जिल्ह्याचा योग्य डाटा न दिल्याने यासंदर्भांत श्रीमती माया सोणवणे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्याकडे वारंवार विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. खरंतर शिक्षणासारख्या पवित्र खात्यात उच्च पदावर कार्यरत असताना असा बेजबाबदारपणा अपेक्षित नसतो. या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीबांच्या मुलांना उपाशी ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली असल्याची प्रतिक्रिया . राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी दिली आहे.
