By : Shankar Tadas
कोरपना :
छत्रपती शिवाजी महाराज संस्था व समस्त गावकारी यांच्या सयुक्त विद्यमाने कढ़ोली खुर्द येथे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. रास्ट्रीय सप्त खंजरी वादक नयनपाल महाराज (शिदोलाकर)यांचा जाहिर प्रबोधन कार्यक्रम याप्रसंगी पार पड़ला. गुणवन्त विद्यार्थी यांचा सत्कारही यावेळी करण्यात करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच उमाजी आत्राम, उद्घाटक ग्रामपंचायत सदस्य दत्ता महाराज मसे तर प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील सविता लांडे, राष्ट्रसंत विचार प्रसारक डॉ. संजय लोहे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती वडस्कार,हनुमान देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद वराटे, माजी सरपंच रमेश वसू, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष विजय बोन्डे, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष बबनराव चन्दनकर यांची होती.प्रास्ताविक दत्ता महाराज मसे तर संचालन गणेश देरकर यांनी केले.
