By : Priyanka Punvatkar Salve
चंद्रपूर : भावसार महिला फाउंडेशन चंद्रपूर यांनी मातृ पितृ दिवस मोठ्या उत्साहात नेहरू विद्यालय चे पटांगणावर साजरा केला. “मातृ देवो भव, पितृ देवो भव” या कार्यक्रमात पालक म्हणून योगिता धनेवार, मीनाक्षी अलोने, मेघा मुधोळकर, अभिलाषा मैंदळकर, प्रीती लखदिवे, पूजा बरडे,आरती गोजे, एकता बरडे,जयश्री गोजे, योगिता मुधोळकर, संध्या मैंदळकर, जागृती बरडे,आदींचे त्यांच्या पाल्याकडून पूजन करण्यात आले. पालक पूजन दिनाचे महत्त्व सांगताना अभिलाषा मैंदळकर म्हणाल्या हा दिवस कुटुंबातील प्रेम आणि एकतेचे महत्त्व दर्शवितो. आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येतो. आई वडील हेच माझे सर्वस्व आहेत त्यांच्यातच सारे तीर्थ आहे. आई-वडिलांची सेवा करणे सर्वात मोठे पुण्य आहे. त्यांच्या पूजनाने लहान व्यक्तीला ही मोठेपण प्राप्त होते मुलांनी आपल्या पालकाचा आदर करावा मनोभावे पूजा करावी त्यांच्या त्यागाबद्दल त्यांचे आभार मानावेत. भेटवस्तू देऊन सन्मान व प्रोत्साहन द्यावे त्यामुळे सौजन्याची भावना वाढीस लागेल. ही सामाजिक परिवर्तनाची गरज आहे उतरत्या वयात आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकले जात असल्यामुळे वृद्धाश्रमाची संख्या प्रचंड वाढू लागली आहे. सध्याच्या काळात माता-पित्यांची हेळसांड होताना दिसतेय त्यांना एकत्र आणून या दिवशी पाल्यांच्या हस्ते पूजन करण्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवायचा आहे. जसे आपले पालक आपल्या मुलांसाठी दिवस-रात्र कष्ट करतात. आपल्या गरजा पूर्ण करतात. त्याचप्रमाणे मुलांचेही कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा. त्यांच्या त्यागाबद्दल आभार मानावेत. खरंतर आदर आणि सन्मान वर्षभर आणि आयुष्यभर दाखवायला पाहिजे परंतु वर्षातून एक दिवस असावा जो फक्त त्यांच्यासाठी समर्पित असेल. म्हणूनच मातृ-पितृ दिन साजरा केला जातो. आज प्रेम दिवसही आहे प्रेम करा परंतु प्रथम आपल्या माता पित्यावर त्यातून आपल्याला शतपटीने प्रेम मिळेल. आज पासून रोज सकाळी माता पित्यांना प्रणाम करूनच घराबाहेर पडायचे अशी शपथ मुलांकडून वदवून घेण्यात आली. व प्रसादाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन मेघा मुधोळकर, तर आभार प्रदर्शन प्रीती लखदिवे यांनी केले वर्डातील व नेहरू शाळेतील असंख्य मुले कार्यक्रमाला उपस्थित होते.
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2024/09/IMG-20240918-WA0029.jpg)