By : Shankar Tadas
नांदा फाटा (कोरपना): श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात नुकताच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून आगामी काळात होणाऱ्या मंडळाच्या परीक्षेत प्रविष्ट दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला यावेळी परीक्षेला समोरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे एक प्रेरणा असावी या हेतूने आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल येथील अथर्व देवदास मोहरले शौर्य पदक व्यक्तिमत्व लिखाण पुरस्कार प्राप्त याचा शाल व श्रीफळ देऊन तसेच अमेरिका या देशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व पहिल्याच प्रयत्नात भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉक्टर मकरंद विलास हजारे तसेच शालेय हॉकी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात निधित्व केलेल्या आराध्या संदीप खिरडकर तसेच महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल संघात चॅम्पियनशिप प्राप्त केलेल्या सार्थक सुभाष खोके या सर्व प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांचा प्रेरणेच्या हेतूने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यालयात आलेल्या भूतकाळातील अनुभवांना भरलेल्या नयनांनी वाचा फोडली डॉक्टर मकरंद हजारे यांनी विद्यार्थी दशेत निर्माण होणाऱ्या आव्हानांना वाचा फोडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन ढोले कोषाध्यक्ष संजय मुसळे सचिव प्राचार्य डॉक्टर अनिल भोसले संस्था सदस्य हनुमान खि रटकर प्राध्यापक विलास हजारे प्राध्यापक देविदास मोहरले उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन यश पुरुषोत्तम धाबेकर तर आभार निकिता विजय सातघरे हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व वर्ग वी चे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
