*ध्येय, नियोजन आणि सातत्य हा यशाचा मूलमंत्र . प्राचार्य डॉ. वरकड.*

लोकदर्शन जिवती 👉प्रा. गजानन राऊत

विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ महाविद्यालय जिवती येथे तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले. या तीन दिवसीय शिबिराच्या निमित्ताने वेगवेगळ्या मान्यवरांचे मौलिक विचार विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळी कलाटणी देण्यास कारणीभूत ठरतील या उद्देशाने प्रतिपादन करण्यात आले. पहिल्या दिवसाच्या सत्रात डॉ.देव प्राचार्य म. गांधी विद्यालय गडचांदूर तसेच प्रा. बांद्रे ग्रंथपाल म. गांधी महाविद्यालय गडचांदुर यांनी तर दुसऱ्या दिवशीच्या सत्रात मा. कांचन पांडे पोलीस निरीक्षक जिवती, मा.डूडूले साहेब वैद्यकीय अधिकारी जिवती उपस्थित होते.तर अंतिम दिवसाच्या सत्रात डॉ. एस एम वरकड प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा आणि स्मिता चिताडे मॅडम माजी प्राचार्य म.गांधी क.महाविद्यालय गडचांदुर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सखोल असे बौद्धीक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले. डॉ. वरकड यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी करियर निवडत असतांना आपल्या सोयीनुसार करिअरची निवड करणे निश्चित ध्येय गाठण्यासाठी त्याचे नियोजन करून, त्या नियोजनात सातत्य राखून जर प्रयत्न केला तर यश हमखास प्राप्त होतील. आपला यशाचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही असे ठाम मत डॉ. वरकड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर मांडले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. शाक्य मॅडम यांनी ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विदर्भ महाविद्यालय हे परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा करिता कटिबध्द असुन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी सदैव सोबत राहील असे प्रेरणादायी विचार मांडले. याप्रसंगी मंचावर डॉ. गजानन राऊत, डॉ. श्रीकांत पानघाटे, प्रा. लांडगे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन डॉ. परवेज अली तर आभार डॉ. योगेश खेडेकर यानी मानले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने प्रा. सचिन शिंदे यांनी उत्तम रीतीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here