लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती
:-चंद्रपूर येथील रंजन सामाजिक मंच चंद्रपूर संस्थेची सभा नुकतीच पार पडली. यावेळी एकमताने कार्यकारिणीची अविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ नंदकिशोर मैंदळकर यांची तर सचिन बरबटकर यांची सचिव पदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुदर्शन नैताम,कोषाध्यक्ष डॉ राहुल विधाते, सहसचिव मोहन जीवतोडे,कायदेशीर सल्लागार, ऍड धीरज ठवसे, गौरव आक्केवार,नितीन चांदेकर, आक्केवार, विजय कोटटे, विनोद करमरकर, तुषार आक्केवार यांची निवड करण्यात आली.
