इ
लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत इरिगेशन, आबस्टिकल अवॉइंडिंग रोबोट, स्मार्ट लॉकर, ट्रॅफिक लाईट, रडार सिस्टम , सोलार ट्रॅकर, हॅन्ड सॅनिटायझर, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट, फायर एक्सटेंग्यूशर, ऑटोमॅटिक पार्किंग गेट, वोईस कंट्रोल चेस्टर ब्लूटूथ, ऑटोमॅटिक स्मार्ट डस्टबिन, वेहिकल एक्सीडेंटल कंट्रोल, ऑटोमॅटिक वॉटर लेवल इंडिकेटर, लेझर होम सिक्युरिटी, स्मोक डिटेक्टर सिस्टम अशा अनेक रोबोटिक शिक्षण प्रणालीचे अतिशय सुंदर सादरीकरण वर्ग ५ वी ते ८ वी मधील ९० विद्यार्थ्यांनी रोबोट शिक्षण प्रणालीतून केले.
या रोबोटिक शिक्षण प्रणालीवर आधारित कार्यशाळेची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांची असून ही संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी मुख्याध्यापिका मंजुषा आलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच रोबोट शिक्षण प्रणालीचे सहाय्यक विनोद नगराळे, गीतांजली गेडाम, श्वेता भटारकर यासह अन्य शिक्षकांनी सहकार्य केले. या कार्यशाळेत पालकवर्गांनी या प्रणालीचा आस्वाद घेतला आणि हा सुंदर उपक्रम शाळेत राबविल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.
