लोकदर्शन गडचांदुर 👉अशोककुमार भगत
कोरपना तालुक्यातील डॉ. आंबेडकर भवन गडचांदुर च्या प्रांगणवर 7 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रंगारंग कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची अध्यक्षता प्रा. सोमाजी गोंडाने यांनी भूषविली. यावेळी श्रावण जीवने, उत्तम परेकर, के.एन. सोंडवले,अशोककुमार भगत,दिव्यकुमार बोरकर, कविकर निरांजणे, मधुकर चूनारकर, प्रभृती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला अतीथीनी पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. यावेळी जीवने व गोंडाणे यांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाला खऱ्या अर्थाने आधार देवून खंबीरपणे साथ देणाऱ्या, बाबासाहेबांना घडविणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाई असल्याचे कथन केले.
त्यानंतर छोटे बालक बालिका यांचे नृत्य सादर झाले. यावेळी भारतीय boudh महासभेच्या महिलांनी एकपात्री प्रयोग, लघु नाटिका, वंदन गीते सादर केलीत. यातून रमाई ही केवळ एक व्यक्ती अथवा पात्र नव्हतं. ते होतं मातृत्वाचं महाकाव्य. मात्तृमनाची काळीजकथा. जीवनाचा एक संपूर्ण दुःखाशय म्हणजे रमाई. अखंड त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे रमाई. अशा विविधांगी प्रसंगातून
रत्नमाला वाघमारे, निळाबाई निरंजने, आशाताई सोंडवले सीमा खैरे, शिला निरंजने ,चंदा रामटेके, करुणा धोटे, संघमित्रा ताकसांडे, माया दुर्गे, सुजाता वाघमारे, संगीता गावंडे, वर्षा निरंजने, मंगला ताकसांडे, ज्योसना तोडे, बेबी वाघमारे, सविता वाघमारे ,सुनीता वनकर, जया खैरे, शिला निरंजने, मीराबाई खैरे, सुजाता निरंजने, सुनीता वाघमारे, प्रेमीला निरंजने, वनिता रामटेके आदींनी नाट्यातून त्यागमूर्ती माता रमाई उभी करत त्यांच्या कार्याचं स्मरण करीत अभिवादन केलं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर खैरे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल निरांजने यांनी केले .या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
