CSTE मध्ये उत्तम कामगिरी : सोनुर्लीचे शिक्षक विजय राऊत सन्मानित

By : Shankar Tadas
कोरपना :लीडरशिप फार इक्विटी पुणे, जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर्स या प्रकल्पांतर्गत CSTE या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. या कोर्समध्ये संगणकीय विचार, तार्किक विचार ,कोडींग आणि सिक्वेन्सीग यासारख्या घटकांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासक्रमास चंद्रपूर जिल्ह्यातून 757 शिक्षकांनी नोंदणी केली होती. या शिक्षकांपैकी 220 शिक्षकांनी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. त्यापैकी टॉप 20 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. या शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनुर्ली येथील विषय शिक्षक विजय गणपतराव राऊत यांनी टॉप फोर मध्ये स्थान प्राप्त केले आहे. 7 फेब्रुवारी रोजी त्यांचा शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांचे हस्ते मानपत्र व लॅपटॉप प्रदान करून सन्मान करण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्यात ,शिक्षणाधिकारी माध्यमिक सन्माननीय राजेश पाताळे आणि उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सन्माननीय विशाल देशमुख साहेब, ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर चे मनकुणाल सर, तुकाराम सर, आणि त्यांची संपूर्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत , मानपत्र आणि लॅपटॉप प्रदान करून श्री विजय गणपतराव राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पंचायत समिती कोरपणाचे संवर्ग विकास अधिकारी सन्माननीय विजय पेंदाम साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री मालवी साहेब, मुख्याध्यापक श्री बाळा बोढे यांचेकडून मिळणारे प्रोत्साहन शिक्षण विस्तार अधिकारी श्री कल्याण जोगदंड साहेब, केंद्रप्रमुख श्री विलास देवाळकर साहेब , यांचे मार्गदर्शन यांच्यामुळे आपल्याला हे यश मिळाले असे श्री राऊत यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here