लोकदर्शन जिवती 👉प्रा. गजानन राऊत
राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने विदर्भ महाविद्यालय जिवतीच्या मराठी विभागामार्फत *मराठी भाषा व त्याचे महत्व* या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचे प्रमूख मार्गदर्शक म्हणुन प्रा. गांगधर लांडगे, प्रा. चतुरदास तेलंग, प्रा. संजयकुमार देशमुख, डॉ. श्रीकांत पानघाटे, डॉ. वैशाली डोर्लिकर उपास्थित होते, यांनी आपल्या विचारातून मराठी भाषा समृध्द व संपन्न कशी होतील, त्याचे प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात वापर करुन जीवनमान कसे उंचावले याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यवहारात जास्तीत जास्त वापर कसा करावा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संगणकीय भाषेत मराठी लिपीचा, भाषेचा योग्य वापर व्हावा असे मार्गदर्शकांनी विचार मांडले. मराठी भाषेत जो गोडवा आहे तो अनन्य साधारणआहे. त्यामूळे तिला जोपासले पाहिजे. तिचा सन्मान केला पाहिजे. असेही मान्यवरांनी प्रतिपादन केले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या मार्गदर्शनातुन साकार झाला. कार्यक्रमांचे संचालन प्रा.डॉ. गजानन राऊत यांनी केले तर आभार प्रा. संजय मुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
