लोकदर्शन 👉अशोककुमार भगत
कोरपनात दिनांक 2फेब्रुवारी 2025 रोज रविवारला प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, कोरपना तालुका कार्यकारिणी व सभेचे आयोजन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन कोरपना येथे करण्यात आले होते.
या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रविंद्र मोटघरे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरकार्यवाह श्री राऊत तसेच कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मनोहर बांबोळे, संघटनेचे सदस्य संजय बोरकर,मून सर राजुरा उपस्थित होते.
सभेची सुरुवात पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संघटनेची भूमिका स्पष्ट केली. अध्यक्ष मोटघरे सर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये आपल्या संघटनेची भूमिका व केंद्रीय कार्यकारिणीचे कार्य इत्यादि स्पष्ट केले. कोरपना तालुक्यातील संघटन बांधण्यावर यावेळी भर देण्यात आले. कार्यक्रमाच्या अनुषघाने यावेळी कोरपना तालुक्याची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामधे कोरपना तालुकाध्यक्ष राजेंद्र डांगे, सचिव प्रा. विनोद पेंदाम ,सहसचिव कु. चंदा गेडाम, कोषाध्यक्ष प्रभुदास मरापे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद जीवने, संघटक प्रविण ढेगंळे इत्यादींची नियुक्ती करण्यात आली. या सभेला उपस्थीत शंभरकर सर,बोरकर सर, निखाडे सर, प्रा. भोयर सर, प्रा. येलपुलवार सर, विजय खाडे सर,पुरुषोत्तम उईके सर,इत्यादींची उपस्थिती होती .
सभेचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा.मनोहर बांबोळे यांनी केले.