सहयोग बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सहयोग बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना : सहयोग बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्थेचे अध्यक्ष पवन देरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
गडचांदूर येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. “एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंत” या ब्रीदवाक्याने डॉ. पंकजकुमार देरकर यांनी सभेची सुरवात केली. या सभेत सहयोग बचत गट वार्षिक आढावा व पुढील योजनांची सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. प्रवीण लोनगाडगे, श्रीनिवास सोनटक्के, प्रशांत रणदिवे, धनंजय बुऱ्हाण, सहयोग बचत गटाचे सचिव नितीन उपगनलावार, सुरेश पाचभाई , अनिल सुर्यतळ, स्वप्नील आत्राम, कुणाल खेडेकर, शेखर बोंद्रे, सचिन देरकर, चंद्रशेखर पाचभाई, कोमल वाटोरे, श्रीकांत खडसिंगे, ऋषिकेश भारती, भारत कुंभारे आणि इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here