वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात हळदि कुंकु समारंभ संपन्न.

लोकदर्शन वालुर👉 महादेव गिरी

वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी दि.4 फेब्रुवारी मंगळवार रोजी विद्यालयात हळदि कुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.महानंदा संजयराव साडेगांवकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.शोभा संजय भोकरे,सौ.मनिषा महादेव गिरी, दैवशाला अशोक पाजगे उपस्थित होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुण्या यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुण्या यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून सुहासिनींचे वाण देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित महिलांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.उखाणे स्पर्धा,फुगे फुगविणे,व संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते.संगित खुर्ची या स्पर्धेत मर्जिना इस्माईल पठाण या मानाच्या पैठणी जिंकून स्पर्धेत विजयी ठरल्या.तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आशामती ज्ञानेश्वर शिंदे यांनी मिळवले व तॄतीय क्रमांकाचे पारितोषिक राधिका किरण भांगे यांनी मिळवले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार ज्ञानदिप विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मोरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.एस.आर.सोनवणे,सौ.जे.बि.शिंदे,सौ.जि.आर.मळी,बि.व्हि.बुधवंत, प्रविण क्षीरसागर,एम.एस.गिरी,डि.आर.नाईकनवरे,आर.बि.राठोड,एस.ए.महाडिक, उमाकांत क्षीरसागर, कैलास राऊत, बळीराम शेंबडे, विष्णु पंडित, नारायण आष्टकर आदिंनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here