एकलव्य इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘बालदृष्टी – २०२५’ उत्साहात

लोकदर्शन 👉 मोहन भारती

बिबी : एकलव्य इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज बिबीच्या वतीने ‘बालदृष्टी – २०२५’ चे उद्घाटन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते सोमवार दि. २७ ला पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंटचे मानव व संसाधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नमित मिश्रा, जनरल मॅनेजर नारायण तिवारी, गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी, संस्थेचे अध्यक्ष अनिल पोडे, राजुरा पंचायत समितीच्या माजी सभापती कुंदाताई जेनेकर, संस्थेचे सचिव आशिष देरकर, कोषाध्यक्ष सचिन आस्वले, संचालक अशोक पोडे, पौर्णिमा वडस्कर, मुख्याध्यापक नितेश शेंडे, शाळा प्रशासक स्वाती देरकर, विठ्ठल टोंगे, अखिल अतकारे उपस्थित होते.
ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे उत्कृष्ट शिक्षण देण्याचे काम एकलव्य इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे सुरू असून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न विद्यार्थी तयार करण्याचा संस्थेने केलेला संकल्प कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
कार्यक्रमाला नर्सरी ते दहावीचा विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांना रिझविले. सत्र २०२३-२४ मध्ये दहावीत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी पुजा विठोबा थेरे हिला संस्थेचे सचिव प्रा. आशिष देरकर यांच्या कडून पाच हजार रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच स्व. दिलीप शेंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शोभा दिलीप शेंडे यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले. वर्षातील सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी म्हूणन संजित प्रशांत मसे वर्ग १० वा तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून संतोषी ईश्वर पेचे तथा चैतन्य चुधरी यांना सन्मानित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सुवर्णं पदक व सन्मान चिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक नितेश शेंडे संचालन शिक्षिका प्रिया चौधरी तर आभार प्रदर्शन तरन्नूम शेख यांनी केले. शाळेचे विद्यार्थी संजित मसे, चैतन्य चुधरी, संतोषी पेचे व रितिका पवार यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *