राजुरा शासकीय आयटीआयची चमू जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अव्वल

By : Shankar Tadas

चंद्रपूर : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय चंद्रपूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुरा येथील चमुंनी बाजी मारली. आयटीआय च्या प्रशिक्षणार्थ्यांनी बुद्धिबळमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक तसेच कबड्डी (मुले) मध्ये प्रथम क्रमांक तर कबड्डी (मुली) मध्ये द्वितीय क्रमांक पटकात विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरत अव्वल क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेसाठी संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच संस्थेच्या प्राचार्य प्रणाली दहाटे व सर्वसाधारण प्राचार्या पी. बी. डोंगरवार सर्व विजयी प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाकरिता गटनिदेशक श्री.रोडे, श्री.मद्देलवा, झामरे मॅडम, श्री. रघोर्ते, श्री. पिंपळकर व इतर सर्वांनी महत्त्वाचे योगदान दिले.

००००००००

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *