लोकदर्शन वालुर👉महादेव गिरी
वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांची गावातील मुख्य रस्त्यावरुन प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशभक्तीपर गितांनी परीसर दुमदुमला होता.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा सरपंच संजय साडेगांवकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गोपिकिशन दायमा, शेषेराव वाघमोडे,माजी उपसरपंच समर शेख,लालखाॅ पठाण राजु शेरकर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय साडेगावकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.व ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्रस्ताविक मुख्याध्यापक एस,डि, भोकरे यांनी केले.भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विविध स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारीतोषिक वितरण करण्यात आले.यावेळी पत्रकार गोपिकिशन दायमा यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष संरपंच संजय साडेगावकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार बि.व्हि.बुधवंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक भागवत मोरे,एम.एस.गिरी,जि.एम.कावळे,डि.आर.नाईकनवरे,व्हि.एन.बोंडे,आर.बि.राठोड,एस.ए..महाडिक, प्रविण क्षीरसागर श्रीमती एस.आर.सोनवणे, श्रीमती जे.बि.शिंदे, श्रीमती जि.आर.मळी, बळीराम शेंबडे, कैलास राऊत, विष्णु पंडित, नारायण आष्टकर आदिंनी परीश्रम घेतले.